महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळाव्याचे आयोजन

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

देशसेवेसाठी लष्करात महिलांना संधी मिळावी तसेच त्यांना देशसेवेची जबाबदारी पार पाडता यावी, या अनुषंगाने भारतीय सैन्यदलाच्या येथील दक्षिण मुख्यालयाकडून महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया अग्निवीर भरती प्रक्रियेअंतर्गत सोमवार (ता. ६) ते रविवार (ता. ११) या कालावधीत खडकी येथील बीईजी अँड सेंटर येथे पार पडणार आहे. यात महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि दमणमधील तरुणींना सहभागी होता येणार आहे.

ही प्रक्रिया शारीरिक, वैद्यकीय व लेखी परीक्षा अशा तीन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा देता येणार आहे. तसेच गुणवत्तेवर आधारित अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना भारतीय सैन्य दलात लष्करी पोलिस विभागात अग्निवीर म्हणून दाखल केले जाणार आहे. या भरती मेळाव्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.