पल्सर चोरताना रंगेहाथ सापडला, खिशात निघाल्या मास्टर चाब्या

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील बढे सर कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस लावलेली बजाज पल्सर गाडीला मास्टर चाबीच्या सहाय्याने चोरी करताना रंगेहाथ पकडला. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी योगेश शांताराम शेलार (वय 25, धंदा. सुतारकाम रा. भडगाव) याने दि. 5 रोजी दुपारी चार वाजता त्याची पल्सर गाडी ही त्याच्या दुकानासमोर लावली होती. त्यावेळी एक तरुण त्या गाडीचे वायरी तोडून त्याच्या जवळील 5 ते 6 मास्टर चावीच्या सहाय्याने चोरी करण्याच्या ईराद्याने घेऊन जात असताना रंगेहाथ पकडला गेला. त्याला पोलिस स्टेशनला आणले असता तो चोरी करत असल्याची कबुली पोलिसांना दिली.

म्हणून आरोपी समाधान मांगो भिल्ल रा. निंभोरा ता. भडगाव याच्या विरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.341/2022 भा.द.वी. कलम 379,511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पो. हे. कॉ. विजय जाधव हे करत आहे. तसेच या आरोपीला पोलिसांनी चांगली विचारपूस केली. तर मोटार सायकल चोर, फोर व्हिलर चोर यांचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.