जळगावकर सावधान; रस्त्यावर दुचाकी पार्क करताय ? मग एकदा वाचाच

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील रस्ते दुचाकी तसेच चार चाकी पार्किंग तसेच विक्रेत्यांसाठी नाहीत ते वाहतुकीसाठी आहे. परंतु संकुल धारकांनी पार्किंग सुविधा न करताच संकुल बांधले आहे. संकुलावरील कारवाईनंतर आता महापालिकेने रस्त्यावर लावण्यात पार्किंग करण्यात येणाऱ्या दुचाकी वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय असून, बुधवार (दि.१०) पासून ही नेहरू चौक ते शास्त्री टॉवर दरम्यानच्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील अनेक संकुलाच्या दुकानासमोरच रस्त्यावर वाहने पार्किंग होत असल्याने रस्त्यावरील वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्त्यावर विक्रेत्यांचे अतिक्रमण होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत करावी लागत आहे. रस्त्यावरील अतिक्रमण टाळण्यासाठी महापालिकेने प्रथम संकुलातील दुकानदारांना तळमजल्यावर वाहनतळ करण्याची नोटीस बजावली होती. ज्यांनी वाहनतळ केले नाही.

त्यांची दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली, पहिल्या टप्प्यात केवळ पाच दुकानावर कारवाई करण्यात आली त्या पैकी दोन दुकानदारांनी आपल्या दुकानांच्या तळमजल्यावर रॅम्प करून पार्किंग सुविधा केली आहे. परंतु अद्यापही तीन दुकानदारांनी सुविधा केलेली नाही, या शिवाय इतर दुकानदारही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दुभाजकापासून १२ मीटरनंतर पार्किंग

महापालिकेतर्फे शहरातील रस्त्यावर पार्किंगचे पिवळे पट्टे मारणार आहे. रस्ते दुभाजकापासून १२ मीटर अंतरावर पिवळे पट्टे मारण्यात येतील त्या पिवळ्या पट्ट्याच्या पुढे वाहन पार्किंग करायचे आहे. जी वाहने पोवळ्या पट्ट्याच्या बाहेर उभे असतील त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.