PHD पेपर फुटीनंतर विद्यार्थी झाले आक्रमक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाज्योती, सारथी आणि बार्टी परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात पेपर फुटल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांनी गोंधळ सुरु केला. पीएचडी फेलोशिपसाठी होणारा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थांनी केलेला आहे. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

विद्यार्थांनी वारंवार होणाऱ्या पेपर फुटीवर संताप व्यक्त केला. त्यामुळे विद्यार्थांनी पेपर फुटलेला असल्याने परीक्षेवर देखील बहिष्कार केला आहे. या घटनेमुळे कमला नेहरू विद्यालयात एकाच गोंधळ पाहायला मिळतो. विद्यार्थी परीक्षेला गेले तेव्हा त्यांना देण्यात आलेल्या काही प्रश्नपत्रकांना सील नव्हते. विद्यार्थ्यांना मिळालेला पेपर प्रिंटेड नव्हता. तसेच पेपर Xerox काढलेला होता. अशी तक्रार विद्यार्थी करत आहेत.

पेपरला सील नसल्याने पेपर न घेता सरसकट सर्वांना फेलोशिप देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यात एकीकडे अजित पवार PHD करून काय दिवे लावणार आहे का? असे म्हणत असतील तर यांनी किमान पेपरला सील लावावे असा प्रतिप्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे. दुरवरून आलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा हा फटका बसल्याने अजूनही गोंधळ सुरू आहे.

नागपूरसह छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील विद्यार्थ्यांकडून आंदोलन केलं जात आहे. परीक्षा रद्द झाल्याशिवाय केंद्र सोडणार नाही, असं विद्यार्थ्यांनी म्हंटले आहे. PHD च्या विद्यार्थ्यांना बार्टी, सारथी, महाज्योतीच्या वतीने फेलोशिप दिली जाते. त्या फेलोशिपसाठी पात्रता परीक्षा आज होती. यातून उत्तीर्ण झालेल्या २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाणार होती. मात्र आता सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.