इशान किशनचे करियर धोक्यात, BCCI शी खोट बोलणं भोवाल !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेला गुरुवार पासून (११ जानेवारी) सुरुवात होणार आहे. मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली परतले आहे. दोघेही नोव्हेंबर २०२२ नंतर प्रथमच टी-२० संघात परतले आहे. दोन अनुभवी खेळाडू परतले, पण टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला संघात स्थान मिळवता आले नाही.

इशान किशनने आतापर्यंत भारतासाठी दोन कसोटी २७ एकदिवसीय आणि ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वर्ल्ड कप २०२३ नंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी इशान किशन हा भारतीय संघाचा भाग होता. आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी देखील मिळाली.

यानंतर, तो दक्षिण टी-२० दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग होता. परुंत त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. इशान किशन मानसिक थकव्याचे कारण देत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतला होता.

आता अशा बातम्या येऊ लागल्या की, इशान किशनला संघात ठेवल्यानंतरही त्याला खेळण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे तो कदाचित नाराज आहे. यादरम्यान इशान किशनच्या दुबईमध्ये पार्टी केल्याची बातमी समोर आल्याने त्याचे टेन्शन आणखी वाढले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.