एम आय डी सी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या हेतूने पोलीस प्रशासन तयारीस लागलेले असून सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन नागरिकांना महत्वाच्या सूचना देत त्यांना अलर्ट करत आहे. आज सकाळी ११ वाजता बकरी ईद आणि आषाढी एकादशी या दुहेरी पार्श्वभूमीवर एम आय डी सी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी दोन्ही समाजातील नागरिकांना शांततेत कार्यक्रम पार पाडण्याचे आवाहन केले असता नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे, महापालिका प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव बोरसे, आदीजण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.