हे होऊ शकतात… भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष ?

0

मुंबई ; अडीच वर्ष सत्तेपासून दूर असलेल्या भाजपने पुन्हा एकदा सत्तेत पुनरागमन केले आहे. शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. राज्यात सत्तापालट होऊन बरेच दिवस उलटून गेले आहेत, आता प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची. याच पार्श्वभूमीवर आता भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांचा शोध सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे…

चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात जागा निश्चित मानली जात असल्याने प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. पक्षाकडून राम शिंदे आणि आशिष शेलार यांच्या नावावर विचार केला जात आहे. २०२४ ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पूर्णवेळ संघटनेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीकडे भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी या दोघांपैकी एकाकडे देण्यात येऊ शकते. त्यामुळे आगामी काळात चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यपद सोडतात का? आणि त्यांनी पद सोडल्यास ही जबाबदारी कोणाकडे देण्यात येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, भाजपकडून अद्याप अधिकृतरित्या प्रदेशाध्यपदाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.