सेवा पंधरवडा अंतर्गंत आज स्वच्छता अभियान

0

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान सेवा पंधरवाडा आयोजीत करण्यात आला आहे. या सेवा पंधरवाडा अंतर्गत आज दि. १ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जळगाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या वेळी खासदार उन्मेश पाटील, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांची

प्रमुख उपस्थिती राहणार आहे.. तरी सर्व भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरचे व प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी मोर्चा / आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्त्य यांनी मोठ्या संख्येसह उपस्थित रहावे, असे आवाहन सेवा पंधरवाडा संयोजक महेश जोशी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.