बेपत्ता प्रौढाचा मृतदेह गिरणा पात्रात आढळला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सावखेडा शिवारातील जलराम नगर येथील बेपत्ता झालेल्या ४३ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा मृतदेह गिरणा नदीच्या पात्रात आढळून आल्याची घटना गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. संतोष रामधन पाटील (वय ४५, रा. जलाराम नगर, सावखेडा शिवार, जळगाव) असे मयत  व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संतोष रामधन पाटील हे जळगावातील सावखेडा शिवारातील जलराम नगरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने मानसिकस्थीती बरोबर नव्हते. यातच बुधवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले होते. याबाबत जळगाव तालुका पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद देखील करण्यात आली होती.

दरम्यान शोधकार्य सुरु असतांना गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गिरणा नदी पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.