कर्जाच्या नावाखाली साडेसहा लाखांचा गंडा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आजकाल फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. जळगावातील एकाला कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली दोन जणांनी साडेसहा लाखात गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पराग प्रभाकर भावसार हा तरुण जळगाव शहरातील राका पार्कमध्ये वास्तव्यास आहे. पराग हा जून २०२१ त्याचा मामेभाऊ भूषण अविनाश भावसार रा. तिडके नगर, नाशिक यांच्याकडे दाक्षायणी फायनान्सशियल सर्व्हिसेस कंपनीत शाखाधिकारी म्हणून नोकरीला होता. सोशल मीडियावर कंपनीचा प्रचार करीत असतांना ओमप्रकाश पाटील आणि राहूल हिलाल देवरे हे दोघे परागच्या संपर्कात आले. भूषण भावसार याने त्यांना सीएसआर फंडबद्दल माहिती देवून कर्ज मंजूर होणार असल्याचे सांगितले. परंतु त्यापुर्वी प्रोसेसिंग फी म्हणून दोघांकडून साडेसहा लाख रूपये भरण्यास भूषण भावसार याने सांगितले. त्यानुसार ओमप्रकाश पाटील आणि राहूल देवरे यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून रक्कम ट्रान्सफर केली. त्याचा पुरावा म्हणून शाखाधिकारी पराग भावसार यांच्या नावाने नोटरी देखील करुन दिली.

मात्र अनेक महिन्यांचा कालावधी उलटून देखील संबंधित कर्जाबाबत पराग भावसार व दोन्ही ग्राहकांनी भुषण भावसार यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. परंतु  काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ओमप्रकाश पाटील व राहुल देवरे यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आहे.  याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.