कार चालकाकडून महिलेची फसवणूक, मृत्यू नंतर उघड झाला प्रकार

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे शहरात एका महिलेची पफसवणूक केल्याच्या प्रकार तब्बल २ वर्षांनी समोर आला आहे. त्या महिलेची फसवणूक करणारा व्यक्ती तीचा कारचालकच होता. त्याने महिलेची कोट्यवधी रुपयांमध्ये फसवणूक केली. विशेष म्हणजे फसवणुकीचा हा प्रकार महिलेच्या मृत्यूनंतर समोर आला आहे. या प्रकरणी ३० वर्षीय कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. अजय राजाराम भडकवाड असे आरोपीचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?
नाना पेठेत राहणारी एका महिलेचा डिसेंबर २०२१ मध्ये मृत पावली. त्या महिलेकडे अजय राजाराम भडकवाड हा चालक म्हणून काम करत होता. त्या महिलेचा ६२ वर्षीय पुतण्या जर्मनीत वास्तव्यास आहे. ते जर्मनी पोलीस दलातून निवृत्त झाले. काही महिन्यांपूर्वी ते भारतात आले. यावेळी त्यांनी घरातील कागदपत्रांची तपासणी केली. त्यावेळी १ कोटी ६४ लाख रुपयांमध्ये पहसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

असा उघड झाला प्रकार
महिलेच्या नावावर अनेक शेअर होते. अजय भडकवाड याला हे माहित होते. महिलेच्या मृत्यूनंतर त्याने खोट्या सह्या करून शेअर विकले. त्याचा पैसा महिलेच्या खात्यात जमा झाला. तिच्या बँकेच्या कागदपत्रावर खोट्या सह्या करून सर्व पैसे सहकारी बँकेत त्याच्या खात्यात घेतले. हा सर्व प्रकार महिलेच्या पुतण्याच्या लक्षात आल्यांनतर त्याने तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची तपासणी केल्यानंतर १ कोटी ६४ लाख फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. त्यांनतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.