जळगावात हद्दपार गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

0

जळगाव ्- प्रांताधिकार्‍यांचे हद्दपारचे आदेश असतानाही कोयता घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या रामानंद नगर पोलिसांनी आवडले असून त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास आरोपी राहुल नवल काकडे वय 23 राहणार समता नगर हा कोयता घेऊन दहशत माजवत असल्याची खबर रामानंदनगर पोलिसांना मिळाल्यावरून त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्टेशनला आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान राहुल काकडे हा हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघन करून हत्यार असं लोकांमध्ये दहशत मजवतासल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.