पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ, वाचा सविस्तर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाही, या कारणावरून विवाहितेला मारहाण करून माहेरी हाकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून ओझर, नाशिक येथील सासरच्या लोकांविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. उंबरखेड येथील माहेर असलेल्या २६ वर्षीय विवाहितेचा ओझर, नाशिक येथील कुणाल कोठावदे याच्याशी फेब्रुवारी २०२२ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर एक महिन्यातच विवाहितेचा तू मला आवडत नाही, असे सांगत पतीने त्रास दयायला सुरुवात केली. तसेच माहेरून चारचाकी वाहन घेण्यासाठी पाच लाख रुपये आणले नाही म्हणून शिवीगाळ, मारहाण करून माहेरी पोहचवून दिले. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासू, सासरे यांच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.