केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी, जळगाव खड्डे मुक्त, विभागीय आयुक्तालय करणार

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावात ग्वाही ; शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रतिसाद

जळगाव ;- केळी विकास महामंडळ स्थापन झाले असले तरी त्याला १०० कोटी देऊन जळगाव शहर संपूर्ण काँक्रीटीकरण करून खड्डेमुक्त करण्याची आणि जळगावला विभागीय आयुक्तालय कऱण्याची मागणी सर्वांचीच असल्याने ती पूर्ण करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगावात आयोजित ‘शासन आपल्या दारी या कार्यक्रमा प्रसंगी केली . यावेळी त्यांनी शास्नानाने जळगावच्या विकासाकरिता विविध योजनांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला असून जिल्ह्यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यानी यावेळी दिले.

जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर शासन आपल्यादारी या कार्यक्रमाचे आयोजन आज २७ जून रोजी करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. व्यास पिठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , कृषिमंत्री अब्दुल सत्तार ,,ना. गिरीश महाजन , पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना. दादा भुसे , आ. राजूमामा भोळे, खा. रक्षाताई खडसे,आ. संजय सावकारे,आ. मंगेश चव्हाण ,स्मिता वाघ,राजू पटेल , जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक , जिल्हा परिषद सीईओ पंकज आशिया यांच्यासह कार्यक्रमाला मोठया संख्येने जिल्ह्यातून लाभार्थी उपस्थित होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांचे हस्ते लाभार्थ्याना वाटप करण्यात आले.तसेच २० रुग्णवाहिकांचे यावेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, शासन आपल्या दारी उपक्रमांमधून हजारो लोक एकाच छताखाली येत आहे. शासन आपल्या दारी येत असून सरपंचांना उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाव आपल्याला समृद्ध करायचे आहे . आपल्याला अनेक योजना सुरु करायचे आहे . सर्वसामान्यांचे हे सरकार असून या ठिकाणी ११ महिन्यापूर्वी छातीठोकपणे सांगत असून तेव्हा आम्ही मी आणि फडणवीस दोघेच मंत्री म्हणून निर्णय घेत होतो. कॅबिनेटच्या विस्तार झाल्यावर सर्वसामान्य व्यक्तींना आम्ही मंत्री पदे दिली .

पहिल्यांदाच लेक लाडकी योजना कार्यान्वित झाली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणासाठी आपले सरकार मोठे पाऊल उचलले जात आहे . सरकार हे सर्वसामान्य लोकांचे आहे. शासन आपल्या दारी यावर काही जणांनी टीका केली . मात्र जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि कर्मचारी गावागावात पोहचले . त्यामुळे शासन आपल्यादारी हि दुर्गम भागात उत्तमपणे पोहचत आहे. लोकाभिमुख कार्यक्रम यासारखा दुसरा होऊ शकत नाही २ लाख ५३ हजार लाभार्थ्याना याचा लाभ मिळत आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे अनेकांची धास्ती वाटून त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. केंद्र सरकारचा राज्य सरकारला पूर्ण अपाठिंबा आहे. एकही निधी परत जात नाही.

आज आपण मोठे निर्णय घेऊ शकतो याचे श्रेय हे मोदी सरकारचे आहे. हि बाब अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. दीड लाख रुपयांची योजना ५ लाखांपर्यंत केली आहे. असे हे सरकार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना या नागरिकांच्या आरोग्यासाठी आहे. केळी विकास महामंडळसाठी १०० कोटींच्या निधीची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली . ३२ सिंचन योजनांना मंजुरी दिली आहे. विभागीय पोलीस आयुक्त कार्यालय हे जळगाव येथे होण्याचा निर्णय शासन लवकरच घेणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. जळगावचे रस्ते काँक्रीटचे करून खड्डे मुक्त जळगाव करणार असल्याची गवाही त्यांनी यावेळी दिली . या राज्यात जेवढ्या पायाभूत सुविधा देशात फक्त आपल्या राज्यात होत आहे. वेगवान निर्णय घेणारे गतिमान सरकार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या सरकामध्ये परदेशी गुंतवणुकीत मागे गेले होते. ते आज ११ महिन्याच्या कार्यकाळात पुन्हा क्रमांक एकवर आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात उद्योगपती येताहेत, रोजगार निर्मिती होत आहे, मनुष्यबळ सक्षम आहे असे सांगितले . जळगावचे सोने शुद्ध असल्याचे भाऊंनी मला सांगितले होते . त्याचा भाव कमी जास्त होत असतो. मात्र इथल्या सारखी सोन्याची माणसे मिळणार नाही. खान्देशची ठेचा भाकर प्रसिद्ध आहे . मात्र गुलाबभाऊ ठेचा असून गिरीश भाऊंनी समजून घ्यावे असे सांगताच सभागृहात हंशा पिकला .

झेंडे कसे दाखवायचे हे आमच्याकडून शिका – पालकमंत्री

राष्ट्रवादीने काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेत त्यांनी राष्ट्रवादीवर कडाडून टीका करून त्यांनी झेंडे दाखविण्याचे काम आमचे आहे ते त्यांनी आमच्याकडून शिकून घ्यावे असे सांगून विरोधकांवर चांगलीच टीका केली. यावेळी जळगाव जिल्ह्यात आयुक्तालय व्हावे अशी मागणी करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात विविध विकासकामे आणल्याबद्दल आणि त्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.


डिंग्या मारून आणि काळे झेंडे दाखवून उपयोग नाही

उद्धव ठाकरे , एकनाथराव खडसे यांच्यावर ना. गिरीश महाजनांची जहरी टीका

शासकीय योजनांचा लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचण्यास शासन आपल्या दारी हि योजना सरकारने आणली आहे. शेतकर्याना आता १२ हजार मिळत आहे. राज्य आणि केंद्राच्या अशा अनेक योजना गेल्या नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या संसदेत भाषण करण्याचा बहुमान मिळाला आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे हे घरात बसून होते . नुसत्या डिंग्या मारून उपयोग नाही . पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची पात्रता नसल्याचे ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली .


एकनाथराव खडसे यांच्यावर काय पाळी आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर ओट्यावर बसले . भोसरी प्रकरण केले नसते तर झेंडे फडकविण्याशिवाय पर्याय त्यांच्याकडे उरला नाही . खडसेंच्या हातातून जिल्ह्यातून सत्ता गेली आहे. झेंड्याशिवाय त्यांच्या काहीही उरले नसल्याची खरपूस टीका ना. गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर केली. शासनाच्या विविध योजना पूर्ण होत असून काही पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे ना. महाजन यांनी सांगितले. कापसावर बोलतांना त्यांनी कापसाला योग्य भाव देऊन आल्यावर सोल्युशन काढा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ना. गिरीश महाजन यांनी केली.

काळे झेंडे दाखविण्यापेक्षा काळी कामे या वयात करू नका – उपमुख्यमंत्री

शासन आपल्या दारी हा उपक्रम हा काही एका दिवसाचा कार्यक्र्म नाही. शासन लोकांच्या दारापर्यंत गेले पाहिजे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दाखले पोहचवा . २ लाख लाभार्थ्यांपर्यंत याचा लाभ त्यांना मिळाला आहे. कोणालाही चकरा मारायला लागल्या नाहीत . काळे झेंडे दाखविण्यापेक्षा काळी कामे या वयात करू नका अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता केली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन योजना पूर्ण होत आहे. ना. गिरीश महाजन यांनी अनेक प्रकल्प सुरु केले होते मात्र अडीच वर्षात सिंचनाकरिता गिरीश भाऊ , गुलाबभाऊ तुम्हाला एक पैसाही कमी पडू देणार नाही अशी गवाही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिली.

शेतकऱ्यांसाठी ४१९ कोटी , नैसर्गिक आपत्ती वेळी मदत केली आहे. एकूण जर बघितले तर शेतकर्याना कापूस बाबत केंद्र सरकारने पुढच्या वर्षीचा हमीभाव दिला आहे. कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत जलजीवन योजना घराघरात पोहचली आहे. पाणीपुरवठा योजना असो कि जळगाव शहरातील रस्त्यांचे कामे करावी असे ना. गिरीश माहाजन यांना उद्देशून सांगत जळगाव खड्डेमुक्त करा अशी विंनती देखील फडणवीसांनी केली. राज्यात मुद्रा लोन मिळाल्याने ते स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे.

 

अनेक योजनांचा लाभ मोदी सरकारच्या कार्यकाळात झाला आहे. महाराष्ट्रात अडीच वर्षे जे सरकार होते त्यांनी योजनांचे काम खंडित करण्याचे काम केले आहे . शिवरायांना मानणारे युतीचे सरकार एकनाथ शिंदे यांच्यामुळे तयार झाले आहे. चाळीस आमदार घेऊन शरद पवार वसंत पाटील यांच्या सरकारमधून बाहेर पडून ते मुख्यमंत्री झाले तेव्हा कोणी मनाई केली नाही मग आता अशी टीका का करता ? पवार साहेबांची मुत्सद्देगिरी मग एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मुत्सद्देगिरी केली आहे.आमचे विरोधकच मोठे गद्दार असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.