लांडोरखोरी येथे ‘ट्रांजिस्ट ट्रीटमेंट सेंटर’ उभारण्याकरिता ८ कोटी ८८ लक्ष रुपये निधी मंजूर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

जळगाव शहर व परिसरात वन्यजीवांवरील उपचारासाठी ट्रान्सलेट ट्रीटमेंट सेंटर (Translate Treatment Center) सुरू करण्यात शासनाने मंजुरी दिलेली आहे. आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जळगाव शहरात आठ कोटी 88 लाखांच्या निधीतून हे केंद्र उभारण्यात येईल जळगाव शहरातील मेहरूण तलाव येथे दरवर्षी ‘फ्लेमिंगो’ (Flamingo) व इतर प्रजातीचे पक्षी अधिवासासाठी येतात संपूर्ण महाराष्ट्रात फक्त नागपूर येथे एकमेव ‘टीटीसी सेंटर’ आहे. प्राण्यांना उपचारासाठी व ते बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी बऱ्याच अडचणी येत होत्या जळगाव शहरातील लांडोरखोरी येथे वन विभागाची जागा असून ते जळगावकरांच्या फिरण्यासाठी एक प्रमुख आकर्षण केंद्र आहे. सदर टीटीसी चा प्रोजेक्ट लांडरखोरी येथे मंजूर झाल्यामुळे तेथील सौंदर्यात अजय व विविधतेत भर पडेल व पशुपक्ष्यांचे हाल होणार नाहीत ही भावना राजूमामा भोळे यांनी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे व्यक्त केले.

ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अनमोल सहकार्याने आमदार राजूमामा गोळे यांच्या निदर्शनानुसार वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी जळगाव येथे ट्रांजिस्ट ट्रीटमेंट सेंटर होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. जळगाव वनविभागाने जळगाव शहरालगत असलेल्या लांडोरखोरी वनक्षेत्रात सुमारे एक हेक्टर क्षेत्रावर ८ कोटी ८८ रुपये निधीतून ट्रान्सलेट ट्रीटमेंट सेंटर वन्यप्राणी व उपचार केंद्र सुरू करण्यासंबंधी प्रस्ताव केला आहे त्यास मान्यता मिळाली आहे. वाढती लोकसंख्या जमिनीचा वापर करण्याची बदललेल्या पद्धतीमुळे वन्य प्राण्यांसाठी वनक्षेत्र अपुरे पडत असून मानवी वस्ती त्यांचा वापर वाढल्याने अपघातांचे प्रमाण होण्याचा धोका अधिक आहे. त्यासाठी जखमी वन्य प्राण्यांसाठी हे उपचार केंद्र वरदान ठरणार आहे वन्यप्राणी उपचार केंद्राचे पायाभूत सुविधा स्थापित केल्यानंतर सुयोग्य यंत्रणेमार्फत योग्य प्रणालीचा वापर करून उपचार केंद्राचे दैनंदिन प्रशासन व्यवस्थापन करणार आहे ८ कोटी ८८ लक्ष निधीतून एक हेक्टर क्षेत्रावर वन्यप्राणी उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.