अरिजितच्या कृतीने क्रिकेटचे चाहते भावूक…

0

 

क्रिकेट, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

देशभरात सर्व क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वात पाहत होते तो क्षण काल आला. म्हणजेच क्रिकेटचा वेगवान फॉरमॅट आयपीएल ला सुरुवात झाली आहे. मात्र ओपनिंग सेरेमनीमध्ये एक दृश्य पाहून चाहते अजूनच भावूक झाल्याचे दिसून आले. ज्यामध्ये गायक अरिजित सिंगने आपल्या गाण्यांनी चाहत्यांची मने तर जिंकलीच, पण सोबतच असे काही करून दाखवले जे पाहून चाहत्यांना आनंद झाला. उद्घाटन समारंभात धोनी स्टेजवर अरिजित सिंगच्या जवळ पोहोचला तेव्हा अरिजितला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याने धोनीच्या पायाला स्पर्श करत त्याच्या पाया पडला.

 

अरिजित सिंगचे धोनीवरील हे प्रेम पाहून चाहते आनंदित झाले आहेत आणि सोशल मीडियावर या फोटोला खूप पसंतीही देत ​​आहेत. आयपीएल ओपनिंग सेरेमनीमध्ये अरिजित सिंगने आपल्या गाण्यांनी माहोल तयार केला होता, मात्र जेव्हा धोनी आयपीएल ओपनिंग सेरेमनीमध्ये पोहोचला तेव्हा चाहत्यांच्या आनंदाला सीमाच राहिली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.