अट्रावल; अवमान झालेल्या ठिकाणी बसविला नवीन पुतळा

0

अट्रावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्मित झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. यावल तालुक्यातील मोठे व महत्वाचे गाव मानल्या जाणार्‍या अट्रावल या गावात आज पहाटे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. सुमारे दहा-बारा जणांच्या जमावाने पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास हा प्रकार केला. त्यांनी पहिल्यांदा येथील पथदिवा फोडून नंतर पुतळ्याची तोडफोड केली. हा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या जमावाने या ग्रामस्थांना मारहाण करत पलायन केले होते.

दरम्यान अट्रॅवल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्या ठिकाणी प्रशासनानी तात्काळ दखल घेऊन जळगाव येथील एस पी साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच आरपीआय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी निळे निशान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर व वाड्यातील बौद्ध उपासक उपासिका आणि बुद्ध वंदना घेऊन पुतळा बसवण्यात आलेला आहे या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाली त्याच ठिकाणी नवीन अट्रावल त्यामुळेअट्रावलं या गावांमध्ये शांतता निर्माण झालेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.