रेल्वे माल धक्क्यावरुन चोरीस गेलेल्या खताच्या गोण्यासह एकास केले जेरबंद

0

पाचोरा ! लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यावरुन ९० हजार रुपयांच्या ६० खतांच्या गोण्या चोरीस गेल्या होत्या. सदरचा चोरीस गेलेला मुद्देमाल मालासह संशयित एका आरोपीस पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेत त्याचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यावरुन १३ मे रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान ९० हजार रुपये किंमतीच्या सुफला कंपनीच्या खताच्या ६० गोण्या चोरीस गेल्या होत्या. पाचोरा पोलिसांनी या चोरीचा धडा लावत २२ मे रोजी अक्तार शेख (पुर्ण नाव माहीत नाही) रा. पाचोरा यास ट्रक क्रं. एम. एच. १९ झेड ४६२४ त्यात असलेल्या ९० हजार रुपये किंमतीच्या खतांच्या ६० गोण्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. अक्तार शेख याचे विरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.