बोरावल येथे गहुला आग लागल्याने खाक

0

लोकशाही न्युज नेटवर्क

 

मनवेल ता.यावल येथून जवळच असलेल्या बोरावल बुद्रक येथील एका शेतकऱ्यांचा गहु जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी घडली. बोरावल बुद्रक येथील जगन्नाथ उखर्डु कोळी यांच्या मालकीचा गट न.१२१ शेत शिवारात गहुची पेरणी करण्यात आली असता गहु मळणीचा वेळेवर या ठीकाणी जंगलात मध जमा करण्यासाठी फीरणाऱ्या आदिवासी लोंकानी जंगलात मध गोळा करण्यासाठी आग लावून मध गोळा करीत असताना आग हवेने रुद्ररुप धारण केल्याने गहु जळून खाक झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामस्थांच्या प्रयत्नाने आग विझविण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.