दहा वर्षापासून फरार अट्टल दरोडेखोर अखेर जेरबंद

0

 

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

जिल्ह्यात ठिक ठिकाणी दरोडे टाकून ऐवज लुटून फरार असलेला आरोपी निलेश उर्फ पिंटू सुरेश भगत (40) यास आज दि. 26 ऑगस्ट रोजी अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांच्या पथकाने साकाळा रचुन  निंबा देवी संस्थान (वडनेर भोलजी) येथुन ताब्यात घेतले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली खामगांवचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशाने पथकातिल अधिकारी पो. उप. नि. पंकज सपकाळे, ना.पो.कॉ. रघुनाथ जाधव, संदीप टाकसाळ, राम धामोड़े, देवेंद्र शेळके तसेच पो स्टे नांदुरा येथील स.पो.नि. मानकर, विक्रम राजपूत, धनंजय वेरुड़कर. वडनेर बिट जमादार संजय निंबोळकर व मलकापुर शहर पो.स्टे येथील डि.बि.पथकाचे पो.हे.कॉ. ईश्वर वाघ, प्रमोद राठोड, आसिफ, सलीम बर्डे यांनी केली आहे. निलेश उर्फ पिंट्या हा सन 2015 पासुन बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यामध्ये पाहिजे होता. दहा वर्षा पासून तो चकवा देत होता. त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून त्याने परिसरात दहशत निर्माण केली होती. अखेर आज अट्ट्ल दोरोडेखोरास पोलिसांनी अटक केल्यानंतर नागरिकांमध्ये आनंदाचे सूर उमटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.