Thursday, February 2, 2023

गजसुकुमाल प्रमाणे क्षमाशील रहा- डॉ.  पदमचंद्र मुनी

- Advertisement -

 

प्रवचन सारांश –  26/08/2022

 

- Advertisement -

आजच्या विशेष प्रवचनामध्ये अंतगढ़ सूत्रमध्ये गजसुकुमाल मुनी यांनी सहनशील व  क्षमाशील बनून त्यांना केवलदर्शन, केवलज्ञान प्राप्त झाले. त्यांचे चरित्र आपल्याला सतत प्रेरणादायी ठरेल. या पर्युषण पर्वात तप, ध्यान, आराधना, उपवास करावा असे आवाहन करण्यात आले.

 

जैन धर्मात साधनेला खूप महत्त्व देण्यात आले. पातंजली योग विद्येत उजव्या नाकपुडीतून श्वास गेतल्याने शरीराला काय फायदा होते हे सांगण्यात आले.. इडा व पिंगला नाडी याबद्दल माहिती सांगण्यात आली. आपली ही संस्कृती पाश्चात्य लोक स्वीकारत आहेत. विदेशी व भारतीय संस्कृति देवाण-घेवाण कार्यक्रमात भारतात रिसर्च करण्यासाठी एक विद्यार्थी आला होता. तो मला भेटला जैन धर्म, तत्त्वज्ञान माझ्याकडून त्याने समजावून घेतले. त्याने वंदन करणे शिकून घेतले. उपवास, तेला करण्याचा अनुभव घेण्याची इच्छा व्यक्त केली. या विषयीचा अनुभव डॉ. पदमचंद्र मुनी यांनी पर्युषण पर्वाच्या तिसऱ्या दिवसाच्या विशेष प्रवचनात उपस्थित भाविकांना सांगितले.

 

जळगाव येथील स्वाध्यायभवन येथे जयगच्छाधीपती 12 वे पट्टधर आचार्यश्री पार्श्वचंद्रजी म.सा. आदीठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरु आहे. गत तीन दिवसांपासून भरगच्च धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. श्रावक-श्राविका साधना, आराधना, जीवदया, सेवा इत्यादी करीत आहेत..

 

प्रवचना प्रारंभी ‘अंतगढ़ सूत्र’ मधील ‘क्षमा का पुजारी’ की रचना सामूहिकपणे म्हटली गेली. आज  ‘अंतगढ़ सूत्र’मध्ये  वाचण्यात झालेला सूत्राबद्दल डॉ. पदमचंद्र मुनी यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. ‘अंतगढ़ सूत्रा’मध्ये गजसुकुमाल यांच्या बद्दल त्यांनी अत्यंत ओघवत्या व वक्तृत्व शैलीमध्ये साधना आणि दृढसंकल्प याबद्दल प्रवचनात समजावून सांगितले. आगमशास्त्रामध्ये साधना, आराधना कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गजसुकुमाल आणि सोमिल यांच्याबद्दल सांगितले की, अणगार स्मशानभूमीमध्ये रात्री गजसुकुमाल ध्यानस्त उभे होते. ते पाहून सोमीलच्या मनात पूर्वजन्माचे वैर जागृत झाले. गजसुकुमालच्या डोक्यावर ओली माती लिंपली व त्यावर जळते कोळसे ठेवले. गजसुकुमालनी त्या वेदना सहन केल्या. समभाव ठेवत सोमीलबद्दल थोडाही द्वेष भाव त्याच्या मनात आला नाही व त्याला माफ केले. शेवटी गजसुकुमाल यांना केवलदर्शन, केवलज्ञान प्राप्त झाले. गजसुकुमाल सारखी क्षमाशील वृत्ती आपण स्वतःमध्ये आणली पाहिजे असा संदेश आजच्या प्रवचनातून मिळाला.

………………………..

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची मेरी भावनाही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे