मराठमोळे सदानंद दाते NIA चे नवे महासंचालक

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्र सरकारनं  एक मोठं पाऊल उचललं आहे. 1990 महाराष्ट्र केडरचे प्रसिद्ध IPS अधिकारी सदानंद वसंत दाते यांची केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) DG पदावर नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या वतीनं सदानंद दाते आणि इतर दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये नियुक्त्या करण्याचे आदेश जारी केले आहेत.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आलेलं. आता दहशतवाद, नक्षलवाद, अतिरेकी, इंडियन पॉप्युलर फ्रंट यांसारख्या बंदी घातलेल्या संघटना आणि खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात देशासोबतच अमेरिका, ब्रिटन, कॅनडात या देशांतून तपास करणाऱ्या एनआयएची धुरा आता सदानंद दाते यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. सदानंद दातेंकडे एएनआयची जबाबदारी सोपवल्यानंतर असं म्हटलं जात आहे की, आता एनआयए अंतर्गत सुरक्षा प्रकरणी अधिक जलद कारवाई करणार आहे.

महत्त्वाची पदं भूषवली

सदानंद दाते, महाराष्ट्र एटीएसचे विद्यमान प्रमुख (एनआयएचे डीजी म्हणून नियुक्ती होईपर्यंत), त्यांनी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये डीआयजी आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये आयजी (ऑप) म्हणूनही काम केलं आहे. मुंबईजवळील मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरांचं पोलीस आयुक्तपदही त्यांनी भूषवलं आहे.

सदानंद दाते आहेत कोण?

सदानंद दाते हे गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ पोलीस सेवेत कार्यरत आहेत. पोलीस सेवेतल्या विविध अनुभवांवर त्यांनी ‘वर्दीतील माणसांच्या नोंदी’ हे पुस्तक लिहिलं आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांना यूपीएससी संदर्भात कळलं. त्यावेळीच त्यांनी पोलीस सेवेत जायचा निर्णय घेतला. समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यास त्या वयात त्यांनी घेतला होता. यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर आयएएस, आयपीएस आणि IA&AS असे तीन पर्याय होते. सदानंद दातेंनी आयपीएस हा पर्याय निवडला आणि पोलीस खात्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.