Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»भाजपाकडून नवनीत राणांना उमेदवारी
    महाराष्ट्र

    भाजपाकडून नवनीत राणांना उमेदवारी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 28, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    खासदार नवनीत राणा या बनावट जातप्रमाणपत्र सादर करून अमरावतीची लोकसभा निवडणूक लढल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द करावं असा निर्णय दिला आहे. परंतु, या निर्णयाला राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलं. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्‍हान देणाऱ्या राणा यांच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या जातप्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे राणा यांच्या उमेदवारीसमोर अडचणी येत होत्या. त्याचबरोबर नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार याबाबत संभ्रमाचं वातावरण होतं.

    मागील लोकसभा निवडणुकीत (२०१९) नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे तेव्हाचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. यावेळी नवनीत राणा या भाजपाच्या तिकीटावर अमरावतीची लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, त्यांना शिवसेनेकडून आणि भाजपाच्या इतर मित्रपक्षांकडून विरोध होत आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. अखेर पक्ष आणि एनडीएतील मित्रपक्षांचा विरोध झुगारून भाजपाने नवनीत राणा यांना अमरावतीतून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. भाजपाने लोकसभा उमेदवारांची सातवी जादी जाहीर केली असून यामध्ये नवनीत राणा यांचं नाव आहे.

    नवनीत कौर राणा यांना अमरावतीत शिवसेनेकडून विरोध होत होता. तसेच येथील माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनीदेखील राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. राणा यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका अडसूळ यांनी घेतली होती. अमरावतीमधील एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या प्रहार जशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू यांचाही राणा यांना विरोध आहे. अशा परिस्थितीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं. परंतु, भाजपाने राणा यांना अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपाने काही वेळापूर्वी लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावतीतून नवनीत राणा यांना तर कर्नाटकच्या चित्रदूर्गमधून गोविंद करजोल यांना उमेदवारी दिली आहे.

    बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ते म्हणाले, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ज्या नवनीत राणाने आम्हाला अपमानित केलं त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही. कार्यकर्त्यांची मानसिकताच नाही. राजकारणात झीरो झालो तरीही चालेल पण इतकी शरणागती पत्करणार नाही. काहीही झालं तरीही राणांचा प्रचार करायचा नाही ही कार्यकर्त्यांची मानसिकता आहे.

    नवनीत कौर-राणा या चित्रपट अभिनेत्री होत्‍या. यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍याशी २०११ मध्‍ये विवाह केला. त्‍यानंतर त्‍यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. २०१४ च्‍या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या उमेदवारीवर अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, त्‍यावेळी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी राणा यांचा तब्बल १ लाख ३७ हजार मतांनी पराभव केला होता. राणांच्‍या जात प्रमाणपत्राविरोधात २०१७ मध्ये आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्‍हणून निवडणूक लढवली. त्‍यांच्‍या उमेदवारीला कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीने पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत त्यांनी अडसूळ यांचा ३७ हजार मतांनी पराभव केला होता.

    #bjp Navneet Rana navneet rana joins bjp
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif