भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतीय जनता पक्षाने तीन राज्यांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या तीनही यादींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, रस्ते परिवहन आणि राज्य मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावांचा समावेश आहे.

संबंधित राज्यांतून अनेक मोठ्या भाजप नेत्यांना स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. राज्यातील स्टार प्रचारकांच्या यादीत अशीही नावे आहे जे विधानसभा निवडणुकीत हरले होते आणि सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकीटही मिळालेले नाही. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 25 दिवसांहून कमी वेळ शिल्लक आहे. 19 एप्रिलला देशात लोकसभा निवडणुकीअंतर्गत पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये अनेक अशी नावे आहेत ज्यांना तिकीट तर मिळालेले नाही आहे मात्र या यादीत सामील आहेत. बिहारमधून अश्वनी चौबे स्टार प्रचारकांच्या यादीत सामील आहेत. तर सय्यद शाहनवाज हुसैनही बिहारच्या स्टार प्रचारकांमध्ये आहेत.

राज्यांचे मुख्यमंत्रीही स्टार प्रचारक

अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही स्टार प्रचारकांच्या यादीत सामील आहेत. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही स्टार प्रचारक आहेत.

तसेच नारायण राणे, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, रामदास आठवले या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर , गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या मुख्यमंत्र्यांचासुद्धा महाराष्ट्राच्या यादीमध्ये समावेश आहे.  महाराष्ट्रातील प्रमुख स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, अशोक चव्हाण, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबई अध्यक्ष, आशिष शेलार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, तसंच मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, अतुल सावे या मंत्र्यांचा समावेश आहे. यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणसुद्धा भाजपाचे स्टार प्रचारक असणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.