आयएमआरच्या विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिसने घेतले एडवांस ट्रेनिंग वर्कशॉप…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

केसीई संचलित इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्चच्या एमबीए, एमसीए आणि इंटिग्रेटेड-एमसीएच्या निवडक ६० विद्यार्थ्यांना इन्फोसिस ह्या जागतिक आयटी कंपनीने १५ दिवसांचे एडवांस स्कील डेव्हेलपमेंट ट्रेनिंग दिले. इन्फोसिस तर्फे २२ मे ते ७ जून दरम्यान घेण्यात आलेली ही खान्देश विभागातील पहिलीच कार्यशाळा होय, ज्यात जागतिक दर्जाचे ट्रेनर शामिल होते. पहिल्या ११ दिवसांत विद्यार्थ्यांनी बंगळूरच्या ट्रेनर रेमी सैनील ह्यांच्याकडून स्कील डेव्हेलपमेंट, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, इंटरव्यू स्किल्स, रेज्युमे बनविणे, कॉर्पोरेट कल्चर, पर्सनल डेव्हेलपमेंट, टीमवर्क, टाइम मैनेजमेंट, सायकोथेरपी एनालिसिस, ग्रुमिंग पावर, पर्सनल ग्रोथ कल्चर तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी कशी मिळवावी, त्यासाठी कुठले प्रयत्न करावेत, कश्याप्रकारे तिथे काम करावे, कामाचे नियोजन कसे करावे, रिपोर्टिंग सिस्टीम काय असते, कॉर्पोरेट प्रेजेंटेशन कसे बनवावे, लीडरशिप स्किल्स कश्याप्रकारे आत्मसात करावी, करिअर आणि नोकरीत कसे उन्नत व्हावे ह्याची इत्त्मभूत ट्रेनिंग विद्यार्थ्यांना देण्यात आली.

त्यानंतर पुण्याहून सिंबायोसिसचे ट्रेनर प्रणव थोरात ह्यांनी उर्वरित ४ दिवसांत विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट, बँकिंग आणि इतर नोकरीसाठी अनिवार्य असणारी एप्टीट्यूड टेस्टमध्ये कसे यशस्वी व्हावे, त्यासाठी कुठली तयारी करावी, इंटरव्यूमधील टेक्निकल भागची तयारी कशी करावी तसेच गणित, रिसर्च आणि क्युटीच्या प्रक्टिकल सिरीजद्वारे विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. ही ट्रेनिंग इन्फोसिसच्या सीएसआरच्या माध्यामतून पूर्णपणे निशुल्क घेण्यात आली. पात्र विद्यार्थ्यांना इन्फोसिसच्या वतीने सर्टिफिकेट देखील देण्यात येणार आहे, जे त्यांना नोकरीच्या वेळी खूप फायदेशीर ठरतील.

ह्या ट्रेनिंगसाठी आयएमआरच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे ह्यांचे मार्गदर्शन लाभले असून ह्या ट्रेनिंगचे संपूर्ण नियोजन आणि सूत्रसंचालन ट्रेनिंग एंड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी केले. तसेच एमसीए विभागाच्या डॉ. तनुजा फेगडे, प्रा. उदय चतुर आणि इन्फोसिस तर्फे स्मिता थोमास ह्यांनी सहर्काय केले.

२२ मे रोजी सुरु झालेल्या ह्या ट्रेनिंग वर्कशॉपच्या उद्घाटन समारंभात आयएमआरच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, त्यांनी ह्या सुवर्ण संधीचा पूर्ण लाभ घ्यावा आणि जीवनाला कलाटणी देणाऱ्या ह्या वर्कशॉप मधून स्वतःला घडवावे कि जेणेकरून विद्यार्थी हे आपले आयुष्य, आपले करिअर घडवून त्याद्वारे कुटुंब आणि समाजाचे ऋण हे आदर्शवत रुपात परत करावे. तसेच संधी ही किती लहान अथवा मोठी आहे, हे महत्वाचे नसून त्याचा लाभ आपण किती चांगल्याप्रकारे आणि मोठ्या प्रमाणात घेतो ह्यावर हे आयुष्य अवलंबून आहे, त्यामुळे मेहनत, चिकाटी, कटीबद्धता आणि सत्यता जीवनात आत्मसात केल्यास जीवनाला नवे वळण मिळू शकते तसेच यशाच्या असंख्य वाटा दिसू लागतात आणि त्यातून स्वबळावर ध्येय साध्य करता येऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.