के.सी.ई बी.एड कॉलेजमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केसीई सोसायटीच्या बी एड महाविद्यालयात प्राध्यापक साहेबराव भुकन अधिषठाता आंतरविदयाशाखा कबचौ उमवि यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाच्या परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी सर्वत्र वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी पर्यावरण संवर्धनाची गरज स्पष्ट केली. महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी  डॉ.निलेश जोशी आणि विद्यार्थी व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांनी वृक्षारोपण केलेल्या रोपांची काळजी घेण्याची शपथ घेतली. तसेच सुरक्षारक्षक यांनी सुद्धा वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. यासाठी रोहित पाटील, निलेश नाईक, केतन पाटील, मोहन चौधरी, शैलेश कुलकर्णी, निलेश सदाफळे, विजय चव्हाण,शरद सोनार  यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.