बेकायदेशीर खडी विक्री, भडगाव तहसिल समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेख शकील शेख बाबू यांनी दिला

0

भडगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव शेत मालक बाहेरगावी असताना पडीत जमीनीवर गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर क्रशर खडी मशीनवरून खडी विक्री केली जात आहे. यात संबधीत खडी क्रशर चालकाकडे क्रशर खडी विक्रीचा कोणताही परवाना नसून यातून पर्यावरणाची हानी हाेत असून शासनाचा करोडो रूपयांचा महसूल बुडीत केला जात आहे. यासंदर्भात संबंधीत खडी क्रशर चालकाची रितसर चाैकशी करण्यात येवून क्रशर खडी विक्री बंद करण्यात येवून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे, तसेच बेकायदेशीर खडी विक्रीस महसूल विभागाचाच आशीर्वाद आहे, या विरूद्ध उपोषण केले जाईल असा इशारा भडगाव येथील रहिवासी तक्रारदार शकील शेख बाबू (राजू शेख) यांनी तहसीलदार भडगाव यांचेकडे तक्रार अर्जाव्दारे दिला आहे.

भडगाव तहसील अंतर्गत टोणगाव शिवातील शेतजमिन गट नं. ५६१/१ शेतमालक कादिरखान हाजी जोरावरखान यांच्या नावाने आहे. कादिरखान हे गेल्या अनेक वर्षापासून व्यवसायानिमित्त गोविंदवाडी, कल्याण येथे स्थायिक असल्याने अनेक वर्षापासुन शेतजमीन पडीत आहे. या शेतजमीनीवर सुंदरबन स्टोन सप्लायर्स, चाळीसगाव रोड, भडगाव असा खड़ी विक्री बोर्ड लावलेला असून बब्बुशेठ उर्फ मुन्सफखान इसाखान व फैजनखान यांच्याकडे खडी क्रशर, गौण खनिज तसेच बाहेर गावाहून दगड फोडुन खडी वाहतूकीने साठा करून विक्री करीत आहेत. खडी विको करण्याचा परवाना नाही. असे असतांना या ठिकाणी बेकायदेशिररित्या खड़ी विक्री करीत असल्याचे तक्रारदार शेख शकील शेख बाबू यांनी म्हटले आहे.
परवाना नसताना खडी विक्री

भडगाव येथे चाळीसगाव रोड लगत हिंदुस्थान पेट्रोलियम तर्फे तक्रारदार शेख शकील शेख बाबू यांना पेट्रोल पंप मंजुर झालेला आहे. पेट्रोल पंप परिसरात बांधकामासाठी खडीची आवश्यकता असताना असल्याने बब्बुशेठ उर्फ मुन्सफखान यांनी सुंदरबन फार्मवर खडीचा भरपुर साठा असून आवश्यक ती खडी विकत देवू असे सांगीतले.  त्यानुसार १३ऑगस्ट २२ रोजी १६ ब्रास २० एम एम खड़ी विकत घेतली असून त्याची पावती क्रमांक १२७९ व वाहन क्र.एमएच एस ४२९७ असा नमुद आहे. या गैरप्रकारे चालणा-या खड़ी विकी संदर्भात स्टोन खडी क्रशरची शंका आल्याने महसूल, पर्यावरण वा अन्य खात्याकडून माहिती घेतली असता स्टोन खडी क्रशर, विक्री वा व्यवसाय परवाना नसून गैरप्रकारे चालणा-या खड़ी विक्रीची शासनास कधीही गौणखनिज स्वामीत्वधन (रॉयल्टी) भरलेली नाही.

एनए नसताना बांधकाम, प्रशासनाची फसवणूक
या शेतजमिनीत बेकायदेशिररित्या ६००० स्केअर फुट बांधकाम केलेले आहे. बांधकाम करतांना बिनशेती, टाउन प्लॅनिंग विभाग, नगरपरिषद वा अन्य संबंधीत विभागांची परवानगी देखील नसून बब्बुशेठ उर्फ मुन्सफखान इसाखान व फैजनखान यांनी शासनाची फसवणुक करीत असून पर्यावरणाची देखील हानी करीत बेकायदेशिर खडी विक्री व्यवसाय करीत आहेत. बेकायदेशीर खडी क्रशर मशीन चालविण्यासह खडी विक्री, बांधकाम करण्यासह पर्यावरणाची हानी करण्यास महसूल, नगरपरिषद, पर्यावरण विभागासह अन्य संबधीत विभागांचा आशीर्वाद असल्याप्रकरणी कारवाई करीत बुडवलेल्या महसूलाची वसूली करावी, अन्यथा शासनाच्या विरोधात उपोषण करणे भाग पडेल, असा इशारा देखील शे.शकील शे.बाबू (राजू शेख) यांनी दिला आहे.या निवेदनाच्या प्रती उपविभागीय दंडाध्िाकारी तसेच जिल्हाध्िाकारी यांना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.