अश्यानेच जगणं स्वर्ग बनत असेल…

0

लोकशाही विशेष लेख

दोघांपैकी एक कुठं ना कुठं कमी पडतोय… मग ते सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा वैयक्तिक (शारीरिक) असेल… या विषयावर बोलतांना काही जेष्ठ श्रेष्ठ आदरणीय सहज बोलून जातात की, आजकालच्या मुला मुलींमध्ये सामंजस्य आणि संवाद नाहीये. परिस्थिती नुसार त्यांना वागता येत नाही वगैरे वगैरे. मात्र याचं खरं कारण एकतर त्यांनाच ठाऊक असतं! किंवा त्यांचं लग्न ज्या पद्धतीने, प्रकारे किंवा कुठल्या परिस्थितीत झालं आहे ते यामागचं मुख्य कारण असावं.

काही अंशी आजची पिढी एडजस्टमेंट करण्यात कमी पडतांना नक्कीच दिसतेय. यामागे त्यांची तुलना करण्याची विचारसरणी जबाबदार आहे. त्यामुळे ते कोणालाही कोणाशीही तुलनात्मक नजरेने बघू लागतात. मग ते त्यांचे निकष लावूनही मोकळे होतात. आणि तिथंच सारं आयुष्यच वाटोळं करून घेतात. असं म्हटलं जातं कि तोडगा काढला तर निघतो, मात्र आपली स्पेस मिळावी, फ्रीडम मिळावं या नावाखाली सर्रास घटस्फोट घेऊन मोकळे होतात. कधीकाळी (बहुतेक वेळा तारुण्यात) यांना पसंत असलेला / असलेली व्यक्ती जेव्हा आयुष्यात नसते. आणि जेव्हा त्यांची जागा खरा जोडीदार (समाजमान्य लग्न करून) घेतो तिथं सुरू होतो हा सर्व खेळ.

कोणी अगदीच समजूतदार असेल तर वेळीच सारं हेरून परिस्थिती अनुकूल करून घेऊन दोघांचं आयुष्य सुकर बनवतो. नाहीतर कुठे कोणी संसाराच्या नावाखाली नशिबाला दोष देत आयुष्य ढकलत जगत असतात. आणि यात एक जमत अशी असते. जे फक्त आपल्याच तोऱ्यात राहतात, ते स्वतः सोबत दोन परिवारांचं नुकसान करून घेतात. एकंदरीत काय तर माणसाने वेळ आणि वयाप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन कसं आयुष्य जगता येईल हे शिकणं महत्वाच असतं. आणि हे ज्याने वेळवर हा धडा शिकून आयुष्यात ते आपल्या आचरणात आणलं. आणि यातऱ्हेने जगू लागला तर, कदाचित अश्यानेच त्याच जगणं स्वर्ग बनत असेल… हो ना…?

आकाश जनार्दन बाविस्कर
जळगाव
९६७३३०३०५७

Leave A Reply

Your email address will not be published.