इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी…

0

 

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आज दि. 28 जून रोजी, इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी शाळेचे अध्यक्ष नरेश चौधरी,  प्राचार्य परवीन खान,  समन्वयक जी. डी. पाटील आणि  शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका हे सर्व उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई पूजन करून झाली. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थानी ‘चंद्रभागेच्या तिरी’  हे गीत सादर करून वातावरण भक्तिमय केले. इ. चौथीची विद्यार्थीनी रिधीमा पाटील हिने आषाढी एकादशीचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांना विठ्ठल- रखुमाई, निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताई, सोपानदेव यांच्या रूपात पाहून वातावरणातील उत्साह वाढला. शिक्षकांनी विठ्ठल अभंगांचा नाद करून वातावरणात जल्लोष भरला.

दरम्यान शाळेचे अध्यक्ष नरेश चौधरी यांनी विठ्ठल रखुमाई व पालखीची आरती केली. जय जय राम कृष्ण हरी,  या जयघोषाने आणि वारकऱ्यांचा गजराने शाळेच्या पटांगणात दिंडी काढण्यात येऊन विठ्ठलाच्या गजराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.