रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे विद्यार्थिनींना आरोग्य मार्गदर्शन

0

जळगाव:- येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना केंद्र जळगाव येथे शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात डॉ. वैशाली जैन डॉ.विद्या चौधरी यांनी मासिक पाळी शास्त्रशुद्ध माहिती व समस्या आणि निराकरण तसेच सॅनेटरी सुरक्षित डिस्पोज या विषयावर मार्गदर्शन केले. नंतर प्रश्न उत्तरांचे सुसंवादात्मक सत्र झाले. शेवटी ८० विद्यार्थिनींना पॅडसचे वितरण करण्यात आले. परिचय साधना दामले यांनी तर आभार श्रुती चौधरी यांनी मानले. यावेळी महिला शिक्षक व विद्यार्थिनीची उपस्थिती होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.