IIT मुंबईत बाथरुममध्ये विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ बनवला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

चंडीगड विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओची घटना ताजी असतानाच आयआयटी मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

 नेमकं प्रकरण काय ?

मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रविवारी रात्री कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वसतिगृह 10 (H10) च्या बाथरूममध्ये तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. रविवारी रात्री ही घटना घडली आहे, अशी तक्रार तिने केली. तिच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. यानंतर पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पिंटू गरिया, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकारानंतर आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, आयआयटीच्या वसतिगृहातील नाईट कॅंटीनमध्ये काम करणारा कर्मचारी पाईप डक्टवर चढून बाथरूममध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. या कर्मचाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.