Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»हिट ॲन्ड रन कायदा रद्द करा – जय संघर्ष चालक – मालक संघटनेचे निवेदन
    उत्तर महाराष्ट्र

    हिट ॲन्ड रन कायदा रद्द करा – जय संघर्ष चालक – मालक संघटनेचे निवेदन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 1, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा ;– केंद्र सरकारने नुकतेच लागु केलेल्या “हिट अँड रन” कायद्या अंतर्गत दोषी आढळल्यास १० वर्षांची शिक्षा व ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सदर कायद्या विरोधात पाचोरा येथे जय संघर्ष चालक मालक संघटना रस्त्यावर उतरून प्रदेश अध्यक्ष प्रविण वाघ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जारगाव चौफुलीवरुन थेट तहसिल कार्यालयापर्यंत लागु करण्यात आलेल्या”हिट अँड रन” कायद्याच्या निषेधार्थ भव्य अशी रॅली काढण्यात आली. याप्रसंगी जय संघर्ष चालक मालक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रविण वाघ, खानदेश सहकार्य अध्यक्ष योगेश पवार, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, बस विभाग उत्तम बोरसे, शहर अध्यक्ष दिपक पवार, वैभव पाटील, शेख शाकीर शेख रशिद, संजय खेडेकर, मंगेश पाटील, विजय सोनवणे, शांताराम वाघ, गजानन पोतदार, संदिप सपकाळे, विनोद सुर्यवंशी, राजेंद्र अहिरे, मिलिंद पगारे, जितेंद्र जाधव, ईश्वर राठोड, प्रशांत धनगर, शामिर खाॅं मुसा तडवी, वसीम पठाण, गणेश पाटील यांचेसह जय संघर्ष चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निषेधास पाचोरा येथील एकता आॅटो रिक्षा चालक मालक युनियन तर्फे एकता आॅटो रिक्षा चालक मालक युनियनचे उपाध्यक्ष सुनिल शिंदे, जाॅईन्ट सेक्रेटरी अनिल लोंढे यांनी जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे.
    अपघात घडल्यास जखमींना मृत्युच्या दारी सोडून पळून जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे मुळीच नाही. परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रा मध्ये जन्म जात असल्या कारणाने आणि आपल्या भारत देशा मध्ये दलित आणि आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरतूद आहे. तशा एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला नसल्या कारणाने ड्रायव्हर हा केवळ स्वतःच्या जिवाच्या भितीने अपघात स्थळा वरुण पलायन करतो. ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची प्रथमतः अंमलबजावणी करणे आणि त्यानंतर “हिट अँड रन” या कायद्या मध्ये कारावासाचा कालावधी व आर्थिक दंड यामध्ये कमतरता करुन त्या नंतरच कायदा लागू करण्यात यावा. अशा आषयाचे निवेदन जय संघर्ष चालक मालक संघटनेतर्फे तहसिलदार यांना देण्यात आले. सदरचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील यांनी स्विकारले.

    #pachora
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif