जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीच्या दोघांवर गुन्हा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, २५ डिसेंबर रोजी जळगाव शहरातील जी.एस. मैदानात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित केलेल्या जाहीर सभेत प्रशांत जुवेकर रा. जळगाव आणि सुरेश चव्हाण के रा. दिल्ली या पदाधिकाऱ्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह विधानकेल्याने आणि पोलिसांनी सभेसाठी दिलेल्या अटी शर्तीचे उल्लंघन करण्यात आल्याने अखेर ४ महिन्यानंतर ९ मे रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भरत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्रशांत जुवेकर आणि सुरेश चव्हाणके या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.