हिरापूर शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील हिरापूर शिवारात एका महिलेचा बेवारस मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील महिलेचा मृतदेह आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याबाबत माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.