स्वतःलाच प्रश्न विचारण्याची सवय लावा- ॲड. उज्ज्वल निकम

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

“वकिल व्यवसायात येणाऱ्या होतकरू युवकांनी खटल्याशी संबंधित माहिती मिळवायला कठोर परिश्रमासह स्वतःलाच अनेक अनुकूल व प्रतिकूल प्रश्न विचारायची सवय लावावी. केवळ एकाच बाजूने अभ्यास करून न्यायासनासमोर यश मिळू शकत नाही”, असे प्रतिपादन महाराष्ट्र सरकारचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Advocate Ujjwal Nikam) यांनी भडगाव येथे केले.

भडगाव येथील ॲड. निलेश जवाहरलाल तिवारी यांच्या विधी व कायदेविषयक सेवा कार्यालयाचे उद्घाटन व कोनशिला अनावरण ॲड. निकम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विमा विकास अधिकारी (पारोळा) मिलिंद मिसर होते. प्रमुख पाहुणे जळगाव येथील समाजकल्याण कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील होते. व्यासपीठावर सौ.रजनी व जवाहर तिवारी, जळगावचे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी उपस्थित होते. ॲड. निकम यांनी स्वतःचे अनुभव कथन करीत वकिलाच्या व्यवसायात पदार्पण करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “होतकरू वकिलाने आपल्याला मिळालेले यश नेहमी तपासावे. खटल्याचे कामकाज नेहमी गुणवत्तेवर करावे. काहीवेळा अशील मंडळी वेगळ्या मार्गाने यश मिळवतात. अशावेळी वकिलांनी सजग असावे.” ते पुढे म्हणाले,”न्यायदान जर वास्तव आणि सभ्यतेच्या बाजूने हवे असेल तर वकिलांनी आपलाच खटला विरोधी बाजूने सुद्धा तपासावा. यासाठी स्वतःला प्रश्न विचारावेत. त्यातून ठामपणे बाजू मांडता येते पण उत्तम बचावली करता येतो. वकिलाने नेमके, सत्य व गरजेपुरते बोलावे. न्यायालयात अशीलाची बाजू मांडताना अभ्यास केलेला हवा. कधीही जास्त व माहिती नसलेले बोलू नये.”

या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत ॲड. निलेश व वैशाली तिवारी, उमेश व रोशनी आणि सरोज तिवारी यांनी केले. प्रास्ताविक व परिचय दिलीप तिवारी यांनी दिला. पंकज पाटील यांनीही मित्रांच्या विचार मांडले. कार्यक्रमास भडगाव, जळगाव, औरंगाबाद येथील विधी क्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी औरंगाबाद येथील सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुरज तिवारी, पारोळा येथील उज्ज्वल मिसर, सिद्धांत मिसर, एरंडोल येथील मोहन शुक्ला, धरणगाव येथील संजय शुक्ला, शेंदुर्णी येथील प्रदीप व आशिष शुक्ला यांचेही सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. प्रास्ताविक. डाॅ. दिनेश तांदळे यांनी केले. आभार ॲड. निलेश यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.