काळजी घ्या ! राज्यात तापमान वाढीची शक्यता, पुढील चार दिवस..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यातील वातावरण सातत्याने बदलत आहे, कधी अवकाळी पाऊस तर कधी प्रचंड ऊन… हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला असून नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. समुद्रातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात उकाडा वाढणार आहे.

तसेच महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात हवामान कोरडे असल्यामुळे राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात गेल्या दोन-तीन दिवस वादळी वारे आणि गारपीटीमुळे गारवा जाणवत होता. परंतु, आता अनेक भागात पाऊत थांबला असून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी नागरिकांना पुढील चार दिवस कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम आसाम हिमालन पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, ओडिशा किनारपट्टी भाग, झारखंड आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टी भागात तुरळक पावसाचा अंदाज आहे. याशिवाय, हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये पुढील २४ तासांसाठी बर्फवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.