शरद मोहोळनंतर अजून एका गुंडाची भररस्त्यात हत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यासह मुंबई आणि अँनगरांमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे. अशातच नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रमाणेच आणखी एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे.

माथाडीच्या साईटवरून झालेल्या वादातूनच पाच हल्लेखोरांनी नेरुळ सेक्टर-२० मध्ये राहणाऱ्या गुंड चिराग महेश लोके (वय ३०) याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना काल (दि. १३) रोजी घडली. या हल्ल्यांमध्ये गुंड लोके याची पत्नी प्रियांका लोके (वय २८) ही देखील गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर नेरुळ मधील डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत चिराग लोके हा नेरुळ सेक्टर-२० मध्ये राहत होता. तसेच तो अरुण गवळी व शरद मोहोळ या टोळीसाठी काम करत होता. चिराग लोके व त्याची पत्नी हे दोघे त्यांच्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात असताना आरोपी अरविंद सोडा व त्याचा साथी साथीदारांनी त्याला अडवुन लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली होती.

यावेळी त्याची पत्नी प्रियांका त्याला वाचवण्यासाठी मध्ये गेली असता, या हल्लेखोरांनी तिच्यावर देखील लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करून पलायन केले. यात चिरागचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी प्रियांका गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर नेरूळमधील डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी आरोपी आरोपी अरविंद रामनाथ सोडा, अरबाज, पगला, शेरा व इतर दोन अशा एकुण पाच मारेकऱ्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न व इतर कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.