विवाहितेला घटस्फोटाची धमकी देत छळ; पतीसह आठ जणांवर गुन्हा

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

विवाहितेने माहेरहून ५० हजार रूपये आणावे. जर पैसे आणले नाहीतर घटस्फोटाची धमकी देवून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह आठ जणांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील मोहाडी येथील माहेर असलेल्या रहिसाबी शब्बीर खाटीक (वय २५) यांचा विवाह सुरत येथील शब्बीर उमर खाटीक यांच्याशी रितीरिवाजानुसार २०१८ मध्ये विवाह झाला. रहिसाबी ह्या शब्बीर खाटीक यांची दुसरी पत्नी आहेत. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली असून त्या त्यांच्याकडेच राहतात.

दरम्यान, दोन्ही मुलींच्या लग्नासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावे अशी मागणी विवाहितेकडे केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. इतकेच नाहीतर पैसे आणले नाही तर घटस्फोट देईल अशी धमकी दिली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या.

याप्रकरणी त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती शब्बीर उमर खाटीक, आलिशानबी हमीद खाटीक, फिरोज हमीद खाटीक, शाहीन फिरोज खाटीक, शिरीन शब्बीर खाटीक, नसरिन शब्बीर खाटीक, मुमजाजबी अमनुर खाटीक, अमनुस यासीन खाटीक सर्व राहणार सुरत गुजरात यांच्याविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ विनोद साळी करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.