धावत्या बसने घेतला अचानक पेट

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नागपूर :धावत्या बसने घेतला अचानक पेट .सकाळी साडे ९ च्या सुमारास नागपूरमध्ये धावत्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यामुळे, परिसरात एकच गोंधळ उडाला होता. वाहकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

माहितीनुसार ही बस क्रिडा चौकातून मेडिकल भवनकडे जात असताना ही घटना घडली.  यावेळी बसमध्ये ४०-४५ प्रवाशी होते. दरम्यान, बसच्या समोरील बोनेटमधून धूर निघू लागला व पाहता-पाहता बसने पेट घेतला. बसला अचानक आग लागताच एकच गोंधळ उडाला. यावेळी चालक दिवाकर काकडे यांनी बस जागेवरच थांबवून वाहक गिरीधर यांनी प्रसंगावधान राखत बसमधील सर्व प्रवाशांना तत्काळ बाहेर काढले. तसेच, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं.

आगीच नेमकं कारण कळू शकलं नाही, मात्र, उन्हामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

दरम्यान, हवामान खात्याने तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यात दिवसा उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत आहे. तापमान ४२ अंशावर असतानाच उन्हाच्या तडाख्यामुळे आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.