यावल / लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील भांडणाच्या कारणावरून एकाला त्याच्या घरात जाऊन सहा जणांनी जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील किनगाव खुर्द या गावात घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
किनगाव खुर्द, ता.यावल येथील भूषण नंदन पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील भांडणाच्या कारणावरून त्यांचे मामेभाऊ मयूर विठ्ठल बोरसे याला जितेंद्र दिलीप कोळी, गणेश नारायण कोळी, लाल्या सत्यवान कोळी, जीवन प्यारेलाल कोळी, प्रफुल शालिक पाटील व लोकेश ईश्वर कोळी (सर्व रा. किनगाव खुर्द) या सर्वांनी बेदम मारहाण केली. तसेच गळा दाबून छातीवर, डोक्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
या प्रकरणी भूषण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सहा जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अजीज शेख करीत आहे.