सोने-चांदीच्या दरात उसळी ; जाणून घ्या आज किती आहे दर

0

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क

आज १ फेब्रुवारी २०२३ रोजी जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने ५७ हजार ७६० रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत ६९ हजार ९०० रुपये प्रति किलो आहे.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती . आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३ -२४ चा अर्थसंकल्प सादर केल्याने सोन्याचांदीच्या दरात वाढ झाल्याचे म्हटले जात आहे . ३१ जानेवारी रोजी जळगावच्या सराफ बाजारात ५७ हजार ११० रुपये प्रति १० ग्राम दर होते यात आज १ फेब्रुवारी रोजी ६५० रुपयांची वाढ झाली .

तर दुसरीकडे चांदीही वधारले असून चांदी प्रतिकिलो ८७० रुपयांनी महाग झाली असून दुपारपर्यंत ६९ हजार ९०० रुपये भाव चांदीला मिळाला.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.