अखेर MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आल यश….

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

दि.३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अलका टॉकीज चौक, सदाशिव पेठ, पुणे येथे MPSC च्या विध्यार्थ्यांच्या अराजकीय साष्टांग दण्डवत आंदोलनात खोत, पडळकर, पवार आदी मान्यवर सहभागी होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा ही २०२३ पासून होणार होती, परंतु गेल्या काही दिवसांपासून परीक्षार्थींनी २०२३ पासून होणारी वर्णनात्मक परीक्षा रद्द करून ती पद्धत २०२५ पासून लागू करावी अशी मागणी केली होती,यासाठी परीक्षार्थींनी राज्यभरात आंदोलनेही केली होती.

आज पुण्यात MPSC चे विद्यार्थी आंदोलनासाठी रस्तावर उतरले. त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), आमदार गोपीचंद पडळकर(MLA Gopichand Padalkar), आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) हे आंदोलनासाठी रस्तावर उतरलो होतो त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्या कानावर घातले त्यावेळी ते म्हणाले, परीक्षा पद्धतीतील बदल २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत विषय मांडणार असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य असा सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

त्यानुसार २ तासातच वर्णनात्मक पध्दत २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय या शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे माजी मंत्री सदाभाऊ खोत,आमदार गोपीचंद पडळकर,आमदार अभिमन्यु पवार यांच्या सह सर्व आंदोलकांनी आभार मानले असून अखेर MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले असल्याचे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.