गोंडगाव येथे घरातून दीड लाखांचा मुद्देमाल लांबविला !

0

भडगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील गोंडगाव येथे घरात ठेवलेला स्टीलचा डबा चोरून त्यातील रोख रक्कम, सोने, बँक पासबुक, आधार कार्ड, रेशन कार्ड, आदी दिड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि.31 रोजी घडली असून या बाबत भडगाव पोलिस स्टशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , सुनील नगराज पाटील (वय- 38) धंदा – मजुरी (आचारी) रा.गोंडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.31 रोजी कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिरायदीची समती नसताना लबाडीचा इराद्याने घराच्या दरवाज्यात प्रवेश करून घरातील स्टीलचा डबा चोरून त्यातील एक लाख ३७ हजार रुपये रोख रक्कम, १२हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम सोने, बँक पासबुक, आधार कार्ड, रेशन कार्ड, इत्यादी एकूण एक लाख एकोन पन्नास हजार रु किमतीचे रक्कम चोरून नेला म्हणून अज्ञात चोरट्याविरूद्ध गु.र. न.29/2023 भा. द.वी.कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो. ना. नरेंद्र विसपुते हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.