जळगावच्या टॉवर चौकात एकावर चॉपरने हल्ला !

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शहर पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या टॉवर चौकात एका तरुणावर चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसानी २ ते ३ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

छत्रपती संभाजी नगर येथील विकी यादव हा तरुण जळगावात कामासाठी आला असून . रविवारी रात्रीच्या सुमारास विकी हा संशयतांसोबत टॉवर चौकात आला होता. त्यानंतर तेथून जवळच असलेल्या एका हॉटेल जवळ ते उभे असताना त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने संशयतांनी विकी यादव वर चोपर ने वार करून त्याला गंभीर जखमी केले. या यामध्ये तरुणाच्या पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळतात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह गुन्हेशोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
तरुणावर चॉपरने हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोन ते तीन संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.