जी.एच.रायसोनीच्या “टॉडलर टेल्स”मध्ये उन्हाळी शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

शहरातील गणपती नगर येथील ‘जी. एच. रायसोनी (G. H. raisoni) “टॉडलर टेल्स”’मधील प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक ३ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान उन्हाळी शिबिराचे (Summer camp) आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व ‘जी. एच. रायसोनी “टॉडलर टेल्स”च्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मैदानी खेळ, कला कौशल्य, नृत्य, संगीत, शुद्धलेखन, लाईफ स्कील्स, योगासने, झुम्बां, फायरलेस कुकिंग इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.

या उद्घाटन कार्यक्रमात “टॉडलर टेल्स”च्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी नमूद केले कि, शिक्षणाबरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, विविध खेळाची त्यांना माहिती मिळावी तसेच त्यांच्यातील सूफ्त कलागुणांना वाव मिळावा हा हेतू समोर ठेवून या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. या कार्यक्रमात क्रीडा शिक्षकांनी विविध खेळाची माहिती व त्यापासून होणारे शारीरिक लाभ यांची माहिती दिली तसेच कलाक्षेत्र सुद्धा विद्यार्थ्यांचे सुप्त कलागुणांना जागृत करते हे विद्यार्थ्यांना कला शिक्षकांनी समजावून सांगितले. सदर उपक्रमाला जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व ‘जी. एच. रायसोनी “टॉडलर टेल्स”च्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.