१०वी,१२वी च्या विध्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना, वाचा सविस्तर

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

नुकतीच १०वी, १२वी च्या परीक्षा पार पडल्या, आणी उत्सुकता आहे तर ती निकालाची. दरम्यान दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावी बोर्डाचे परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार अशी माहिती मिळाली आहे. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या (Exam) उत्तरपत्रिकांची तपासणी शिक्षक, शिक्षेतर संघटनांनी संप पुकारला होता. त्यानंतर आता उत्तरपत्रिका पत्रिका तपासण्याचे काम जलद गतीने सुरू असल्याने निकाल वेळेत लागणार आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेची पेपर तपासणीची डेडलाईन १५ एप्रिल असणार आहे. तर त्यााधी बारावीचे उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे दहावी-बारावीचा परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, संप मागे घेतल्याने दहावी-बारावीचा निकाल वेळेत लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दहावीची परीक्षा २ ते २५ मार्चच्या काळात झाल्या. यंदा दहावीच्या परीक्षेला १५ लाख,७७ हजार, २५६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२३ या काळात आयोजित करण्यात आला आहे. बारावीच्या बोर्डाची परीक्षेस राज्यात १४ लाख ५७ हजार २९३ परीक्षेस बसले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.