३ ग्रॅमी पुरस्कार जिंकले आणि अभिनेता पोहोचला थेट तुरुंगात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रॅपर किलर माइक हा सध्या चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात किलर मायकला तीन पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. पण ग्रॅम पुरस्कार जिंकल्यानंतर किलर माइकला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणामुळे किलर मायकला तीन पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. किलर माइकला पोलिसांनी का अटक केली? हे नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात…

किलर मायकला पोलिसांनी केली अटक
सलग तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर रॅपर किलर मायकला लॉस एंजेलिस पोलिसांनी क्रिप्टो डॉट कॉम अरेना येथे अटक केली. या प्रकरणाबाबत लॉस एंजेलिस पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची पुष्टी केली. किलर माईकच्या टीमनेही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रिपोर्टनुसार, किलर माइकला छेडछाड केल्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमात सुरक्षा रक्षकासोबत झालेल्या कथित बाचाबाचीमुळे माइकला पोलिसांनी अटक केली आहे.

किलर माइकने तीन ग्रॅमी पुरस्कारांवर कोरलं नाव
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याच्या प्री-टेलीव्हिजन भागादरम्यान 48 वर्षीय किलर माइकनं तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर त्याला पोलिसांनी लगेचच अटक झाली. त्याने त्याच्या “सायंटिस्ट्स अँड इंजिनिअर्स” गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट रॅप गाणे, सर्वोत्कृष्ट रॅप परफॉर्मन्स आणि मायकेल या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम हे तीन पुरस्कार जिंकले.

Leave A Reply

Your email address will not be published.