धक्कादायक; नाशिकमध्ये ईडीची छापेमारी, ८ कोटीच्या रोकडसह सोन्याची बिस्किटे जप्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही महिन्यांपासून आयकर विभागाने नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने भल्या पहाटे नाशिकमध्ये दाखल होऊन ४ जणांच्या १० ते १५ ठिकाणच्या कार्यालयांमध्ये कडक कारवाई केली होती. त्यात आता पुन्हा बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदारांच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यावधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले. तब्बल 8 ठिकणाहून ही छापेमारी झाली असल्याची माहिती मिळत आहे.

याचदरम्यान आयकर विभागाने ८ ठिकाणाहून ८५० कोटींहून अधिक रुपयांचे वैयहर बेहिशेबी असल्याचाच आयकर विभागला संशय आहे. या छाप्यात ८ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि ३ कोटी रुपयांची सोन्याचे दागिने, बिस्कीट, जप्त केले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आयकर विभागाच्या या छापेमारीत कोट्यवधी रुपयांची कागदपत्रे आणि पेन ड्राइव्ह तपासणीसाठी जप्त केले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आयकर विभाच्या या छापेमारीत कोट्यवधी रुपयांची कागदपत्रे आणि पेन ड्राइव्ह तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत. काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या घरातून तर काहींच्या कारमधून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी नाशिक शहरात जीएसटी विभागातर्फे मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबविले होते. यामध्ये काही बांधकाम व्यावसायिकांच्या ५ ते ६ तास चौकशी झाली होती. या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे यापूर्वी शहरातील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत असलेले आणि सध्या मुंबई, पुणे किंवा मोठ्या शहरात कार्यरत असलेले अधिकारी रडारवर होते.

काही बांधकाम व्यावसायिकांकडे चिठ्ठ्या सापडल्या असून या चिठ्ठ्यांवर इंग्रजी वर्णमाला अक्षरांच्या आधारे तपासण्यात करण्यात आली. यात काही लोकप्रतिनिधींची नावे समोर आली होती. संबंधित तरुणीची ५ ते ६ तास चौकशी केली असता. काही बांधकाम व्यावसायिकांमध्ये मोठी माया सापडल्याचीही चर्चा होती. या धडसत्रानंतर नाशिकमधून अडीचशे ते तीनशे कोटींचा कर भरला गेल्याची चर्चा होती. त्यानंतर आता आयकर विभागाने महापालिका तसेच शासनाच्या बांधकाम विभागाशी संबंधित कंत्राटदार तसेच बिल्डरांवर बुधवारी छापे टाकल्याची माहिती समोर आली होती.

आता पुन्हा एकदा महसूल आयकर विभागाचे पथक नाशिकमध्ये धडकल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. बुधवारी सकाळी शहरातील सर्वात मोठ्या शासकीय कंत्राटदारांची ७ लाख निवासस्थाने आणि कार्यालये अशा तब्ब्ल ४० ठिकाणी एकाच वेळी धडकले. त्याने त्या ठिकाणाहून ताबाच घेतला. संबंधित व्यवसायांची खाती, संगणक, व्यवहार यांची चौकशी सुरू करण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.