आईच्याच घरात मुलीने केली बुरखा घालून १३ लाखांची चोरी !

0

नवी दिल्ली ;- एका महिलेने स्व:ताच्या आईच्या घरात चोरी केल्याची धक्कादायक माहिती दिल्लीत द्वारका भागात समोर आली आहे. आरोपी महिलेवर कर्ज असल्याने तिने चोरी केली.असल्याचे उघड झाले असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केले आहे. श्वेता (वय ३१) असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरातून आरोपीची ओळख पटवली.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने स्व:ताचे आईच्या घरी चोरी केली. महिलेने सुमारे १३ लाख, साडेनऊ हजार रुपयांचे दागिने चोरले. द्वारका जिल्हा पोलिसांनी महिलेने अटक केली. घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. महिलेने बुरखा घालून चोरी केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ३० जानेवारी रोजी विंदापूर पोलीस ठाण्यात घरात चोरी झाल्याची तक्रार मिळाली. घरात ठेवलेल्या कपाटातून तोडफोड न करता दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनेच्या दिवशी बुरखा घातलेली एक महिला घराचा दरवाजा उघडून आत जाताना दिसली. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समजले की, महिला ही तक्रारदाराची मुलगी आहे. पोलिसांनी आरोपी श्वेताला ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.