दोंडाईचा राज्य महामार्गावर भीषण अपघात, १ जण जागीच ठार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दोंडाईचा राज्य महामार्गावर चिमठाणे (ता.शिंदखेडा) गावाजवळ दोंडाईचाकडून सोनगिरीकडे जाणाऱ्या गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मालपूर (ता. शिंदखेडा) येथील एकाचा मृत्यू झाला, तर अन्य एकजण जखमी झाला आहे.

धुळे जिल्ह्यातील मालपूर (ता.शिंदखेडा) येथील कैलास गोपीचंद लांडगे (वय ४३) व रमेश भाईदास भलकार (वय ४२) हे दोघे मोटारसायकलने मालपूर येथून चिमनथण्याकडे जात होते. दरम्यान चिमठाणे येथील बुराई नदीवरील पुलाजवळ त्यांचा अपघात झाला. दोंडाईचाकडून भरधाव वेगाने येत असलेल्या गॅस सिलिंडरच्या ट्रकने दुचाकीला जोराने धडक दिली. या धडकेत मोटारसायकल चालक तरुण कैलास लांडगे जागीच ठार झाला, तर रमेश भलकार जखमी झाला.

अपघातात जखमीस सोनगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनगीर- दोंडाईचा राज्य महामार्गावर ४ फेब्रुवारीला दुपारी साडेचारच्या सुमारास मोटारसायकलला धडक देणाऱ्या गॅस सिलिंडर वाहतूक करणारे वाहन पळवून नेले. मात्र ग्रामस्थांनी सोनगीर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर वाहन रात्री शिंदखेडा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.